मी लहानपणापासून लिहित आले आहे, कविता करीत आले आहे. माझ्या आयुष्यातील ब-या-वाईट घटना केवळ लिहिणे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही, तर या अनुभवा मुळे कोणाला चार गोष्टी कळाव्यात आणि या अनुभवातून कोणाला तरी त्याचा फायदा व्हावा, अशी इच्छा आहे...
वाचा, बरे वाटल्यास जरूर कळवा ...
- शमा काझी
- ठाणे, महाराष्ट्र, India
- कविता लिहीण्यासारखं बरंच काही आयुष्यात घडत गेलं, शब्द आपोआप लिहीते झाले. ब-याच रचना ह्या व्यक्तिगत असून तुम्हांला आवडतील, अशी अपेक्षा आहे. आवडल्यास जरूर कळवा... ०२२-२५४२९९४९
माझ्याविषयी थोडंसं
शोधाशोध
पाऊस आला गारा पडल्या, उन इथे होते
क्षणात पाऊस क्षणात प्रकाश, तेजाने झळकतो
काय आम्हां दाविले त्याने, नाचा बागडा स्थित-प्रज्ञतेने
सर्व काय ते अमुच्या हाती, काय तुम्ही बढाया मारता ?
गारा वेचूनी मुठीत धरा, पाणी पाणी ते जाहले
काय राहीले तुमच्या हाती ?
क्षणात पुन्हा उनही आले, ढगांनी वर ताशे वाजविले
शोधुनी शोधुनी काय शोधता, आहे तेच पहाताना
वेचूनी वेचूनी काय वेचता, उपयोगिता संहाराकरीता
उलटे होऊनी पहा तुम्ही, अमर्त्य नाही कुणी इथे शिवाय आनंद
जे जे उत्तम सूंदर उत्तुंग, सर्वोपयोगी घ्या तुम्ही शोधूनी
सर्व नाश टाळा, चमत्कार सांगतो दाऊनी परोपरी
काही नाही तुमच्या हाती, देणे घेणे आमुच्या हाती
समजूनी घ्या तुम्ही, ना नाही आमची, करा शोध तुम्ही
छोटी मोठी झलक दाऊनी, इशारा करतो मानवा, समजूनी रहा तुम्ही !
शमा काझी ... १५ मे २०१०
युरोप टूर करीता एप्रिल ते सप्टेंबर हा कालावधी सोईस्कर म्हणून आठ एप्रिल चे विमान टिकीट खरिदले, आता रहायचे, फिरायचे आणि आजूबाजूचे सौंदर्य मनसोक्त पहायचे ठरविले पण निसर्गाने हसत हसत सांगितले की ईटालीत घरी बसून रहा, स्वच्छता आणि शांततेचा अनुभव घेत आधी आराम कर, तरतरीत हो, आल्यापासून आठ दिवस सतत पाऊस पडत रहीला....जवळपास पूर्ण एप्रिलभर पाउस आणि गार वारा, जसे निसर्ग माझी आई बनून मला जोजवित होता, तेंही छान वाटले, मग मध्येच एक दिवस स्वच्छ ऊन, ....आम्ही पण काही कमी नाही, त्या स्वच्छ दिवसांत व्हेनिस, ऑस्ट्रिया आणि जर्मनीमध्ये दोन छोट्या ट्रिपा केल्या, निसर्गाला टाटा केला...मजा आली, छान वाटले.
आता उद्यापासून प्यारीस, हॉलंड आणि बेल्जियम ची सैर करायचा प्लान चांगला होण्यासाठी निसर्गाला हात जोडीत निसर्ग साथ देईल का याचा विचार करता करता, काल चमत्कार झाला, आता मात्र निसर्ग आम्हांला साथ देणार हे नक्की झाले, कारण कालच त्याने वरून खळखळून रस्ताभर नाणी टाकली, पाच मिनिटे गारांचा असा काही पाऊस पाडला आणि सांगितले की जा, आता हवा छान आहे, आयफेल टॉवर पहा आणि तृप्त व्हा.... गारांचा पाऊस पाहून आणि गेल्या काही दिवसांत निसर्गाची निरनिराळी रूपं पाहून जे सुचलं ते असं....
This is my humble effort to put into prose my feelings of life and its happenings. Please do give your valuable comments to enable me to enhance this blog.
मम मातेचे स्मरण होता काय वाटते मजला -
मी कसे कथू ते तुम्हां - गूज करावे तिज पाशी ते -
ती दिसतच नाही मजला - आज जरी मी साठी उलटली -
तरी मी लहान होते तिजसाठी - पृथ्वी तलावर नाही कुणाच्या मी मांडीवरती -
किती कवी ते वर्णिती अपुल्या मातेचे ममत्व -
परी मजपाशी शब्दश्री अपुरी - काय वर्णू तिचे मी कवित्व -
किती थोर मनाची होती ती -
परधर्मीय होऊनी मी - मज कवटाळिले तिने उराशी -
मज नाही तिने धिक्कारिले कवण्या वेळी - पुस्तकी शिक्षण नव्हते तिज पाशी -
विश्व धर्मं आचरिला तिने -
पडियेला बाळ मारीयला माय
काय जहाले तीज तीही जाणे
पोटामध्ये अग्नी जाळ पेटताये
आपुनी मारीले ते फुलावानी जहाले
लोकानी हाशीले हृदय पेटूनीच गेले
शहाणे बाळ तेव्हाच समजले पड़ने मातेला शोभा नाही देते
क्षणभर तू येऊन गेला,
रान उठले भूतकाळचे.
त्या अगतिक वेळी उभा तू सामोरी -
लेकरांमुळे मी अगतिक होते ...
अर्थार्जन मज भाळी होते
विद्यार्जन ते तुज आवडीचे
स्वावलंबन ते मज आवडीचे
जन्म न अपुल्या हाती असतो
तुझ्यामधली प्रेमळ आई मज भावते
खट्याळ भाऊ तुझ्यातला तो मज आवडतो
ते काय वाटले नाही समजले
उभ्या वाळवंटी पांडुरंग, पांडुरंग, विठ्ठ्ल मी ऎकिले
तू थांबला असतास तर बरेच काही घडले असते ...
तुझी ऊर्जा तुला तेच सांगत होती ,
तुझा लक्ष्य तू उदरातून ऐकला होतास
पण तू नंतर बावचळलास रे बावचळलास,
मधून मधून बरे वाईट तुला समजत होते ।
पण ज्या कालखिंडारात तू घुसलास तिथून परत येणे अशक्य होते -
तुझी होत असलेली उदो उदो ही अवगुणांची होती कां ?
तीच तुझ्यातल्या गुणांची त्याच वेळी झाली असती तर ...
तर तू आज या गुणी जनांत असतास शान्तीरूपात
आज रडतात ते तुझ्या शरीर अस्तित्वा करीता
पण ती हासत असेल, तुझ्या दुसर्या शान्तीमयातेकरिता ...
आला तलाखीत, बीज रोपट्याला पहाया हॉस्पिटलात
बाईने घेतला रुपया फेकलेला
कशी लाज नाही वाटली तिला
ऐकुनी गार गार गारठाले मी
लाथ का नाही मरिलीस त्याला
विकलास स्वाभिमान एक रुपयात
धर्मं ग्रंथ नाही तू बदलू शकत.
पण एकाटीला तरी अडले कुठे?
घासतेस भावाघरी भांडी -
धुतेस सर्वांची लुगडी
घासभर अन्न खाउनी अश्रू ढालातेस मोलाचे
एक रुपयात विकलेस मोल त्याचे?
शमा काझी ।२१-०१-२००१
माझ्या मनीचे विचार हे प्रश्न ही मीच करते
किती युगांनी एक कविता
मज जवळी आली,
ऐकुनी हर्ष भरे नाचले नाचले मी
विश्वास बसेना अशी ही कविता असते का कली युगी
प्रथम श्रवणी, प्रथम दर्शनी आवडली ती मज
घाट पकडुनी, कवटाळुनी तिज
पोटी धरूनी उरांत साठवली मी तिज।
मग विचार आला, कुणी रचिली ही,
निर्मिती क्षण कोणता हिचा
आणुनी मजकडे दिली कुणी ही
काही समजेना मला.
लिहिले लिहिले अन् फाडून टाकले
हे वाचले न् ते वाचले
सर्वात मीच आहे वाटले.
मग माझ्या लिखाणात वेगळे काय राहिले ?
एकदा मनी आले शाहिले शाहिले का बरे फाडिले?
तेव्हाच कुठेतरी का नाही धाडिले?
समानुभवी थोडे मिळाले
वेगळाले ते पहिलेच पळाले
सुखात सोबती बहुत मिळती
एकांती कोण कवटाळती?
मन पाखरू फड फड करी
आजवरीचे दिन वेगळाले
माझीच मी बोलत होते मूकपणी कुणी ऐकत होते?
आज कळाले मूकपण ते मज धिक्कारत होते
नवीन पर्व अजी सुरू जहाले
न्याहाळतां न्याहाळतां या परिचितांना
असच काहीतरी लिहायचे असते -
अन् पेन कागद शोधता शोधता ते मला सोडून पळून जाते ...
अस का होते, अस का होते, करता करता ते वाकुल्याच दाखवते.
ते पुढे अन् मी मागे ती पळापळ खरीच -
मग पुन्हा येईल म्हणून सोडून देते ...
न् मग एकदम कळतं -
ते माझ्या हृदयाच्या कप्प्यात लपलय ...
पण ते नागवं असल्यामुळे लोकंसमोर कसे आणायचे?
नेसवता येत नाही अजून मला ...
मी एकटी कशी
सुविचार दृढ निश्चय आहेत की मम सोबती -
गाडीत गर्दी कमी का असते ?
स्टेशन येतां, ती जादा कमी होत जाते
प्रवासी मैत्री आपुली खूप जमते
न वेळ येता टा टा होऊन जाते
जीवन एकटेच सुरु होते
अंती जाणेही एकटेच होते.
धर्म निधर्म मला काही समजत नाय,
ती बाडं वाचायला अन आचरणात आणायला वेळच नाय,
न भरणारे
पोट भरण्याकरिता आन् वरवर फातणार्या कपड्याकरिता -
न मिळणारया घराकरिता रात्रंदिवस राबता राबता धर्म जो बनला तो मला पाठ हाय -
जेवाणाकरिता ताट पाट कुणी मांडला नाय -
नवीन कपडे घालून बघ कुणी म्हाटला नाय
पास की नापास कोणी विचारलं नाय
धर्म कशाबरोबर खातात ते कुणी समजावले नाय -मला जसा समाजाला तसा खाल्ला न पचवला -
ही फॅशन म्हणून नाय तर जन्मजातच उपेक्षेचे मला काय वाटले नाय -
कारण त्या पलीकडे
काही अपेक्षिलच नाय -ज्यानी अपेक्षाभंग केला नाही त्यांना त्रिवार वंदन उभे केले त्यानी
ज्यानी तो केला त्यांनाही त्रिवार वंदन समृद्ध केले त्यांनी .
आज जज्ज मेला, कोर्ट सुद्धा जळुन खाक झाले
मी शोधत असते नित्य नूतन
त्या मुळे न झुरते एकच घेऊन
माझ्या पाशी अनेक कल्पना
त्या घेऊन मी फिरते रात्रं दिन
आकाशी घालून गवासणी
मी येते माझ्या सदनी
तेव्हा नवीन विचार घेऊनी
सदाफुली सदाफुली तुझ्या पासूनी मी काय घेशी
या झोपाळ्यावरून त्या झोपाळ्यावर घेतल्या फिरक्यामनाच्या झोक्याला चैनेनाकाहीतरी कुठे तरी हरवले, मुळीच बाई गवसेनाडोळ्याला डोळा लागेनाउगीच पडून राहू किती मन आक्रंदूनी आंत बाहेर करीसोन्याची भाल न करडांत घालमाझीच तर्हा झाली तशी तुझीही कर तशी म्हणू कशीशमा काझी । 29-06-1989
होय, होय, आता आता मी घरातून निघाले, नीं
संतीणीच्या थडग्यातून वहाळा पर्यंत धावलें॥
न पुन्हां वहाळा कडून शाळेत आले॥
गोणावर बसून बे एके बे शिकले॥
धावत धावत घरी आले, पाटी पुस्तक फेकलें॥
अन दुकानावर गेले - लागड़ीच्या आम्ब्याचे आम्बे गोळां केले॥
रसाल आंबे, बिटाके आंबे गदाग्याचे आंबे, आन्बेच आंबे
राण्यांची मंज्या कुशांची वीजा, तेल्यांची नकल्या, कमला, वच्छा॥
सर्वांना देऊन वाटून खाल्ले॥
देवाच्या घरात वहिनीच्या खोलीत बाईच्या खोलीत न आईच्या खोलीत॥
घरभर हिंडले, विहीरीवर गेले॥
मागील दारी, पुढच्या दारी, मधल्या घरांत जाऊन बसले
भिर, भिर फिरले ईकडे तिकडे ...
होय, होय, आता आता मी बाहेरच्या चौफाळ्यावर वडलाना पाहीले॥
घरांत आले तर आई बाई ला पाहिले॥
परसांत जाऊन पेरणी वर चढाले, न मागे वळून पिंपळावर गेले॥
पिंपळा ची विहीर आटली होती, वहाळाचे पाणी सुकले होते॥
सर्व जागा भाकरड भासली॥
घरांत आले, कान आसुसले, ईकडे तिकडे भिरभिर पाहीले
त्या जागेंवर कुणीच नव्हते ,,, डोळ्यांत मात्र पाणी तरळले...
....................................शमा काझी / ०४/०५/१९८९
त्या सोन चाफ्याच्या फुलांत माझ्या चंद्रा मावशी चे प्रेम
माझा जातो तोल, धर तू सावरून, मज नाही आधार तुझ्यावाचून ...
बावनी उलटली नाही, काळजी सुटली, मला वाटते ती मी स्वतः स्विकारली...
तू नाही लादली, कूणीं नाही लादीली, स्वतः हून मी ती स्वतः स्विकाराली....
पोरटी रूपी ही सांप, तुझ्या स्तवनांत आडवी येती...
मला न जमे, झिडकारोनी यांना तुझे गीत गाणे, तुझे रुप समजोनी, जोजविले मी यांना
कवन येत नाही मजला तूंच दीक्षा देई, मनी लागे तळमळ करूण रुप गांवे तुज
भिकारीण मी जन्मिची नाही रुप, लक्षण नाही, तुझे देणे मजपांशी की मला वाटे मी तुझे लेणे....
कितीं आळवू मी तुज ब्रम्हा , विष्णू, महेष...
शांत चित्त दे मज, तुझे स्तवनी हीच आंस शेष ...
.....................................शमा काझी, १२/१०/१९८१
ज्याचे त्याचे प्रांत निराळे
कुणाचे बाल्य संपले तारुण्य आले
आमुचे तर बाल्य निसटले
तारुण्यही संपले
वार्धक्याच्या क्षितिजावरुनी
मागे फिरुनी कटाक्ष देता
हाती गोड कडू मिश्रण आले
लहानपणा पासून विचार करत आले , जमेल तसे लिहित गेले,
काही कविता कागदावर उतरल्या , काही मनातच राहिल्या...
हा ब्लॊग बनविण्यासाठी उन्मेषने बरीच मेहनत घेतली,
कविता उतरवून घेण्याचे कामात मंजूने हातभार लावला......
कविता आवडल्या तर जरूर कळवा, तुमचं मत ऎकायला मला आवडेल.
संपर्क करा : ०२२-२५४२९९४९