06:50

दिलासा

Posted by शमा काझी

उभ्या वाळवंटी पांडुरंग, पांडुरंग, विठ्ठ्ल मी ऎकिले

विश्वासिले आणि कौतुक कि हो केले
चार रत्ने रचूनी, इशश्री ची जोड दिली कोंदणाला
त्याची किमया समजली कां हो कुणाला ?

स्वयेच पांडुरंग घरी आला ॥ आनंदाच्या डोही आनंद निभाला
किती खाच-खळगे या जगती ॥ किती धर्म आणि जाती
मला न समजे यातील कांही - प्रयास नाही समजायचा
अनुभवाची शाळा माझी - बरे वाईट समोर येई
विठ्ठले साथ घेऊनी सर्व पार केले - मज काही न उणे राहीले
परंतु माझी एक विनंती ....

अठ्ठ्याहत्तरीचे भान ठेवूनी विनविते, नमिते विठ्ठला !
रागवले कधी अधिक ऊणे बोलिले - चुकून चुकले ऎसे जाहाले
समजूनी तुम्ही या पांथस्तीला फार करा !

शमा काझी । १८-१२-२००६

0 comments: