07:06

सूर्यास्त

Posted by शमा काझी

ते काय वाटले नाही समजले

पाणी मात्र डोळ्यात दाटले

झप हा झप हा, लाटा मात्र झपझपत होत्या
त्याचे पाय धुवूनी
धाऊनी येत मला काही सांगत होत्या

कां दाटले डोळे तुझे ? उद्याही येईल हे रूप घेऊनी
आणि असेच पुन्हा उद्या जाईल क्षितीज ओलांडूनी

हा खेळ सृष्टीचा आम्ही रोजची पाहतो
पाऊले धुऊनी, झप झप धाऊनी जगा सांगतो

फेसही येतो आमुच्या तोंडी हे सांगताना
हा खेळ निसर्गाचा असाच चालायाचा परतीच्या वाटेवरचा
नको खंत त्याची

हा म्लान का दिसतो जाता जाता, उद्या मी ही दिसणार नाही त्याला अता !

शमा काझी । ३०-०५-२००७

0 comments: