माझ्या ब्लॉगवर या ज्या कविता आहेत, त्या "आयुष्यावर बोलू काही" अशाच स्वरूपातील आहेत, त्या व्यक्तिगत आयुष्यावर आहेत, त्यामुळे ती व्यक्तीच आपल्याला तिला कविता रूपात काय म्हणायचे आहे, ते निवेदन रूपात सांगेल, पण त्या कुणाकडून तरी गायल्या जाऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचाव्यात, अशी इच्छा मात्र जरूर आहे.

या कवितांमध्ये एका निराधार तरूणीने परमेश्वराच्या मदती करीता सुरूवातीपासून कशी आळवणी केली आहे, पण तो परमेश्वर कुठला, तर तिच्या श्रद्धेत, विश्वासात, मैत्रीत, अशा तिच्याच आंतरिक शक्तीत आढळलेला परमेश्वर. त्याला तिने वेळो-वेळी हांक मारली आहे आणि तिला मदत मिळालेली आहे. आता ती ब्याऎंशी वर्षाची तरूणी आहे, त्याच विश्वासाने ती या शक्तीला मदतीला बोलावते, आणि कामे होऊन जातात, कधी वेळ लागतो, कधी थकवा जाणवतो पण तिने अजून पर्यंत त्या शक्तीला सोडून दुसरी वाट धरलेली नाही

शमा काझी

|Home