07:56

धर्म

Posted by शमा काझी

धर्म निधर्म मला काही समजत नाय,
ती बाडं वाचायला अन आचरणात आणायला वेळच नाय,
न भरणारे
पोट
भरण्याकरिता आन् वरवर फातणार्या कपड्याकरिता -
न मिळणारया घराकरिता रात्रंदिवस राबता राबता धर्म जो बनला तो मला पाठ हाय -
जेवाणाकरिता ताट पाट कुणी मांडला नाय -
नवीन कपडे घालून बघ कुणी म्हाटला नाय
पास की नापास कोणी विचारलं नाय
धर्म कशाबरोबर खातात ते कुणी समजावले नाय -मला जसा समाजाला तसा खाल्ला न पचवला -
ही फॅशन म्हणून नाय तर जन्मजातच उपेक्षेचे मला काय वाटले नाय -
कारण त्या पलीकडे
काही अपेक्षिलच नाय -ज्यानी अपेक्षाभंग केला नाही त्यांना त्रिवार वंदन उभे केले त्यानी
ज्यानी तो केला त्यांनाही त्रिवार वंदन समृद्ध केले त्यांनी .


शमा काझी | 05-02-1990

0 comments: