युरोप टूर करीता एप्रिल ते सप्टेंबर हा कालावधी सोईस्कर म्हणून आठ एप्रिल चे विमान टिकीट खरिदले, आता रहायचे, फिरायचे आणि आजूबाजूचे सौंदर्य मनसोक्त पहायचे ठरविले पण निसर्गाने हसत हसत सांगितले की ईटालीत घरी बसून रहा, स्वच्छता आणि शांततेचा अनुभव घेत आधी आराम कर, तरतरीत हो, आल्यापासून आठ दिवस सतत पाऊस पडत रहीला....जवळपास पूर्ण एप्रिलभर पाउस आणि गार वारा, जसे निसर्ग माझी आई बनून मला जोजवित होता, तेंही छान वाटले, मग मध्येच एक दिवस स्वच्छ ऊन, ....आम्ही पण काही कमी नाही, त्या स्वच्छ दिवसांत व्हेनिस, ऑस्ट्रिया आणि जर्मनीमध्ये दोन छोट्या ट्रिपा केल्या, निसर्गाला टाटा केला...मजा आली, छान वाटले.
आता उद्यापासून प्यारीस, हॉलंड आणि बेल्जियम ची सैर करायचा प्लान चांगला होण्यासाठी निसर्गाला हात जोडीत निसर्ग साथ देईल का याचा विचार करता करता, काल चमत्कार झाला, आता मात्र निसर्ग आम्हांला साथ देणार हे नक्की झाले, कारण कालच त्याने वरून खळखळून रस्ताभर नाणी टाकली, पाच मिनिटे गारांचा असा काही पाऊस पाडला आणि सांगितले की जा, आता हवा छान आहे, आयफेल टॉवर पहा आणि तृप्त व्हा.... गारांचा पाऊस पाहून आणि गेल्या काही दिवसांत निसर्गाची निरनिराळी रूपं पाहून जे सुचलं ते असं....

1 comments:

Niranjan said...

Happy journey

मजा करा आणि आल्यावर सविस्तर वर्णन लिहा.

निरंजन