08:34

कृतज्ञता

Posted by शमा काझी

सदाफुली सदाफुली तुझ्या पासूनी मी काय घेशी

सदा बहार न सदा हासी -- एकजिनशी ॥

सानुलीला आणूनी उभी केली, पुछिले तिजशी काय खाऊ खाशी
म्हणते कशी, थोडेसे तिर न थोडे किरणाशी
उभे रहाण्या जराशी धरती - पांघरणे आहे आकाशी
सदाफुली सदाफुली तुझ्या पासूनी मी काय घेशी

निरोगी रहाणी न विचार सरणी - जादा हाव कदापी न धरीशी
कधी म्युन्सिपाल्टीही मेहेरबानीशी पाणी न मिळे आम्हांशी
मानव धर्म जाणूनी आम्ही पाहीले प्राशी, तिला ठेविले उपाशी
म्लान चेहरा हासूनी बहरूनी अम्हांशी लाजवी
सदाफुली सदाफुली तुझ्या पासूनी मी काय घेशी

सर्व समान वाटूनी घ्या न हासत ठेवा सर्व समान
कधी कष्टी होऊनी मी बाहेर उभी राही ग्यालरी
रंग बहारी फुला-फुलातूनी मजशी हितगुज करी
हासहासूनी जगास हासवी तेच खरे सुख जिवनी
दुःख आपुले जगास का ह्या, आहे कुणी घ्यावया राजी ॥
सदाफुली सदाफुली तुझ्या पासूनी मी काय घेशी

दुःख आपले अपुल्यापाशी, सुख सांगावे दुस-याशी
इवलशी छकुली बहरूनी आली, इवलसं पाणी, इवलशी कुंडी
कधी नाही रुसली, कधी नाही फुगली
माझं प्रेम तीच समजली
सदाफुली सदाफुली तुझ्या पासूनी मी काय घेशी

शमा काझी । ०१-०७-१९८९