21:51

किती युगांनी एक कविता

Posted by शमा काझी

किती युगांनी एक कविता
मज जवळी आली,
ऐकुनी
हर्ष भरे नाचले नाचले मी
विश्वास बसेना अशी ही कविता असते का कली युगी
प्रथम श्रवणी, प्रथम दर्शनी आवडली ती मज
घाट पकडुनी, कवटाळुनी तिज
पोटी धरूनी उरांत साठवली मी तिज।
मग विचार आला, कुणी रचिली ही,
निर्मिती क्षण कोणता हिचा
आणुनी मजकडे दिली कुणी ही
काही समजेना मला.

विचार करूनी थकले अन झोपी गेले
एक शुभांगिनी मज स्वप्नी आली ललकारीत
युगायुगाची मांग तुझी ही
घे जवळी करूनी हिच्या शक्ति-निशी लढ तू आता प्रतोगामी शक्तिशी
प्रभात समयी जागी झाले - पासष्टीचे भान न उरले
उत्साहाने मन तुडुंब भरले - कवितेचा त्या आशय समजूनी
मन उत्कट झाले
काल क्रमण अतां सुलभ जहाला
नमस्कार त्या कृतीशिलतेला
नमस्कार त्या निर्म्याताला

शमा काझी । ०१-०३-१९९४




शमा काझी | 01-03-1994

0 comments: