09:13

कल्पना

Posted by शमा काझी

होय, होय, आता आता मी घरातून निघाले, नीं
संतीणीच्या थडग्यातून वहाळा पर्यंत धावलें॥
न पुन्हां वहाळा कडून शाळेत आले॥
गोणावर बसून बे एके बे शिकले॥
धावत धावत घरी आले, पाटी पुस्तक फेकलें॥
अन दुकानावर गेले - लागड़ीच्या आम्ब्याचे आम्बे गोळां केले॥
रसाल आंबे, बिटाके आंबे गदाग्याचे आंबे, आन्बेच आंबे
राण्यांची मंज्या कुशांची वीजा, तेल्यांची नकल्या, कमला, वच्छा॥
सर्वांना देऊन वाटून खाल्ले॥
देवाच्या घरात वहिनीच्या खोलीत बाईच्या खोलीत न आईच्या खोलीत॥
घरभर हिंडले, विहीरीवर गेले॥
मागील दारी, पुढच्या दारी, मधल्या घरांत जाऊन बसले
भिर, भिर फिरले ईकडे तिकडे ...
होय, होय, आता आता मी बाहेरच्या चौफाळ्यावर वडलाना पाहीले॥
घरांत आले तर आई बाई ला पाहिले॥
परसांत जाऊन पेरणी वर चढाले, न मागे वळून पिंपळावर गेले॥
पिंपळा ची विहीर आटली होती, वहाळाचे पाणी सुकले होते॥
सर्व जागा भाकरड भासली॥
घरांत आले, कान आसुसले, ईकडे तिकडे भिरभिर पाहीले
त्या जागेंवर कुणीच नव्हते ,,, डोळ्यांत मात्र पाणी तरळले...
....................................शमा काझी / ०४/०५/१९८९

2 comments:

Unmesh Bagwe said...

ही फारच सुंदर कविता आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा हा भाव-विकल क्षण आपण छान टिपला आहे..

शमा काझी said...
This comment has been removed by the author.