07:35

भावांजली

Posted by शमा काझी

त्या सोन चाफ्याच्या फुलांत माझ्या चंद्रा मावशी चे प्रेम

अन रामफळात माझ्या कुंभार माठीतल्या आजीचे प्रेम
शेवंती, आबोली, मखमालीतून अन तिळाचे लाडू, २ वाटी भाजी
आंबोळीतून माझ्या बाई काकीचे प्रेम, अन चुरणाची भाजी तांदळाची भाकरी
सुंदर सुंदर गोष्टी, वन्सा या नाजूक हाकेतून माझ्या अनी वहिनीचे प्रेम
काही न करता सर्वच केलन त्या माझ्या आईचे प्रेम- मला न समजलेले

माझ्या वडिलांचे प्रेम, सर्वांनी जिच्या भोळ्या प्रेमाचा फायदा घेऊन
शेवटी एकटीच राहीलेल्या माझ्या आये आजीचे प्रेम
आणि छोटीशी हे जग सोडताना मला यमू यमू करणा-या माझ्या हिरू बहिणीचे प्रेम
झालातून गूळ पळविले म्हणून मागे पळणा-या माझ्या ताता काकाचे प्रेम
आणि तो माझ्या प्रेम-मूर्ती आईचा मुलगा होता म्हणून त्याच्या विषयी प्रेम
भाची म्हणून शाब्दिक आधार देणा-या माझ्या बाबू मामांचे प्रेम

आणि माझा रंग सावळा म्हणून मी खिजगणतीत नसलेल्या पण मला आवडण-या
माझ्या राजा मामाचे प्रेम
मानसिक आधार देणा-या माझ्या गुलवाडी मामाचे प्रेम
आणि माझ्या मुलांवर अपार प्रेम करणा-या माझ्या ममा-पपांचे प्रेम
इमासाठी खडखडे लाडू देणा-या शिरीवर्दमाच्या आईचे प्रेम
वरून पाणी घेताना डोळ्यात तरळणारे कोसल्या किरीस्तावणीचे प्रेम
अजवरी हे प्रेमामृत मी राखूनी राखूनी प्याले

मज सर्व परीही तुमची नावे नामशेष होती भितीस्तव या
गावून कवने अजरामर करीते
मम कृतज्ञता जाणूनी. समजूनी घ्या मजला भावांजली अर्पिते मी
तुमची विमला

शमा काझी । ०६-०४-१९८९

0 comments: