07:15

आठवणी

Posted by शमा काझी

आज जज्ज मेला, कोर्ट सुद्धा जळुन खाक झाले

पुन्हा उभे न रहाण्यासाठी

कशासाठी वाट पहाते न्याय मिळेल म्हणून, गुन्हा काय माहीत नाही का ??
हजार गुन्हे करणा-यांच्या कडून न्याय कोण देणार

सहजच कधीतरी ती म्हणाली पोटी जर कृष्ण जन्मला तर
उत्तर आले तर , तर काय असे आहे प्रेमा कटंक आश्रमात जायचे
तुमच्या लोकांसाठी आश्रय आहेच, नाही तर आमच्या करीता
काही तरी करत रहायचे - काल आज उद्याही

कसले हासणे, कसले रडणे, उभारिले सोसत राहीले- न्यायाची वाट पहाते
त्यांना स्वतःचे क्षण नाहीत - तुझ्या सारखे त्यांनाही आहेत.
त्यांच्याही फायलीवर फायली पडून, तुझी सर्वात खाली
वर येईपर्यंत गुन्हेगार मेलेला- तुझेही तसेच जज्ज पण मेला

जरा बाहेर पहा - उरला सुरला त्राण आण - ती सेवा पहा - ते शोध लक्षात घे
ती लेखणी, ती गरज, किती किती जण वाट पहात आहेत,
जे वाट पहात आहेत, त्यांच्याकडे पाठ - पाठ फिरवणा-यांकडे वाट - कां ?
का हा हव्यास - ही आंस - तू जज्ज आहेस तुझा

विश्वासी नातं आहे ना, मग झोकून दे- तद्रूप होशील, विश्वास आहे मला...

शमा काझी । १२-१२-१९८९



0 comments: